पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज झाली इतकी किंमत कमी...


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा कपात झालीय. इंधन कपातीचा आजचा सव्वीसावा दिवस आहे. पेट्रोल प्रतिलिटर १७ पैशांनी तर डिझेलचा दर तर १६ पैशांनी कमी झालेत. पेट्रोलचा दर ८३.०७ रुपये एवढा तर डिझेलचा दर ७५.७६ रुपये एवढा झालाय. 
Loading...

गेल्या महिनाभरापासून पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीच्या किंमतीत काही अंशी का होईना घट होताना दिसतेय. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किंमतीमुळे इंधन दरात कपात होतेय.
20 टक्के घसरण

आंतरराष्ट्री बाजारात कच्चे तेल 3 ऑक्टोबर 2018 ला ब्रेंट क्रूड 86.74 डॉलर प्रति बॅरल होतं.


ज्यामध्ये 9 नोव्हेंबर 2018 ला घसरण होऊन 69.70 डॉलर प्रति बॅरल झालं. WTI क्रूड देखील 20 टक्क्यांनी कमी होऊन 65.60 डॉलर प्रति बॅरल झालंय.

गेल्या 21 दिवसांपासून पेट्रोल डीझेलच्या किंमतीत घसरण पाहायला मिळतेयं.

मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 76.22 रुपये प्रति लीटर आहे.

केंद्र सरकारने किंमती केल्यानंतर शुक्रवारी सलग 21 व्या दिवशी पेट्रोल डीझेलच्या किंमतीत कपात झाल्याचे पाहायला मिळतंय.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.