नगरसेवकपुत्राकडून वाढदिवसाच्या पार्टीत हवेत गोळीबार

                                

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दिवाळीत कोल्हापूरच्या सरपंचाने हवेत गोळीबार करुन दिवाळी साजरी केली. तर आता ठाणे महानगरपालिकेतील एका शिवसेना नगरसवेकाच्या मुलाने हवेत गोळीबार करुन त्याच्या वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे.


Loading...
ठाणे महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवक संजय पांडे यांचा मुलगा नील पांडे याचा शुक्रवारी वाढदिवस होता. या वाढदिवसाची पार्टी लोणावळ्यातील एका फार्म आयोजित करण्यात आली होती. वाढदिवसाचा धिंगाणा सुरू असताना नील पांडे याने हवेत गोळीबार करुन आपला वाढदिवस साजरा केला. नील पांडे हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब समोर आलीये. 

अशा पद्धतीने वाढदिवसाला हवेत गोळीबार करणे ही कोणती संस्कृती, ही कोणती परंपरा पाडली जात आहे? असा प्रश्न आता सामान्य जनतेला पडला. अशा प्रकारे नशेत किंवा बेजबाबदार पणे हवेत गोळीबार करताना दुर्घटना घडून अनेकांचे नाहक बळी गेले आहेत. पोलीसांचा वचकच राहिला नसल्याने असे प्रकार घडताहेत हे या घटनेवरून स्पष्ट होतंय. याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी नील पांडे आणि त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित मित्रांचा जबाब नोंदवलाय.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.