आघाडीच्या निर्णयाकडे काँग्रेस व राष्ट्रवादीमधील इच्छुक उमेदवारांचे लक्ष.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत. त्यापूर्वी राष्ट्रवादीने इच्छुकांना उमेदवारी अर्जांचे वाटप केले होते. पाच दिवसात तब्बल १०४ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले. हे अर्ज भरून घेतल्यानंतर राष्ट्रवादी सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे. 


Loading...
बहुतेक ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार निश्चित झालेले आहेत. मात्र, त्यांची अधिकृत घोषणा अध्याप झालेली नाही. काही ठिकाणी तर संपूर्ण पॅनल देखील निश्चित झालेला आहे. मुलाखतीनंतर उमेदवारांची नावे अधिकृतपणे जाहीर केली जाणार आहेत. काही ठिकाणी एकाच प्रभागातून अनेक इच्छुकांनी उमेदवारीवर दावा केलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला अनेकांच्या नाराजीला तोंड द्यावे लागणार आहे. 

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, हा निर्णय स्थानिक पातळीवरच घ्यावा, अशा सूचना वरिष्ठांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. मात्र, असे असले तरी हा निर्णय स्थानिक पातळीवर होणार नसल्याचे सध्याचे चित्र आहे. ही निवडणूक स्वबळावर लढण्याची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मानसिकता आहे. त्यामुळे काँग्रेसला बरोबर घेणार नाही, असे स्पष्टीकरण आमदार संग्राम जगताप यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. 

त्यानुसारच त्यांच्याकडून रणनीती आखली जात आहे. आघाडीचा निर्णय झाल्यास काही ठिकाणच्या जागा राष्ट्रवादीला सोडून द्याव्या लागणार आहेत. त्यामुळेच आघाडीच्या निर्णयाकडे काँग्रेस व राष्ट्रवादीमधील इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.