श्रीगोंद्यात रेल्वेतील महिला प्रवाशांचे सोने चोरट्यांनी ओरबडले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी शिवारात रेल्वे क्रॉसिंगजवळ थांबलेल्या रेल्वेतील महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोने चोरट्यांनी ओरबाडले. हा प्रकार रविवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये घडला. दोन्ही महिलांनी याप्रकरणी नगरच्या रेल्वे पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे. 


Loading...
या परिसरात यापूर्वीही चोरीचे व लुटीचे प्रकार घडले आहेत. कोल्हापूर ते गोंदिया मार्गावर धावणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस पहाटे तीन ते साडेतीनदरम्यान बेलवंडी शिवारातून जात होती. क्रॉसिंगवरुन दुसरी रेल्वे जात असल्याने महाराष्ट्र एक्स्प्रेस काही काळ थांबली. ही संधी साधून चोरट्यांनी खिडकीच्या कडेला बसलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आेरबाडले. हा प्रकार लक्षात येताच या महिलांनी आरडाओरडा केला. मात्र, चोरटे अंधाराचा फायदा घेत पळून गेले. 

काही वेळाने महाराष्ट्र एक्स्प्रेस नगरच्या रेल्वेस्टेशनवर आली. दोन्ही महिलांनी नगरच्या रेल्वे पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली. एका महिलेच्या गळ्यातील एक तोळे वजनाचे, तर दुसरीचे दोन ते अडीच तोळे वजनाचे सोने चोरट्यांनी लांबवले. रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Loading...
Powered by Blogger.