जनतेच्या मनातील पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सत्तेत सहभागी असलो, तरी शिवसेनेने गेल्या चार वर्षांत जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतल्याने पुढील वर्षी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्वास आमदार विजय औटी यांनी व्यक्त केला. प्रभाग ८ मध्ये माजी उपनगराध्यक्ष अनिकेत औटी यांच्या पुढाकारातून २२ लाख रूपये खर्चून तयार करण्यात आलेल्या पिंपळेश्वर उद्यानाचे लोकार्पण करताना आमदार औटी बोलत होते. 


Loading...
जयश्री औटी अध्यक्षस्थानी होत्या. पंचायत समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, हसन राजे, गणपतराव आंबुले, अनिकेत औटी, दत्तात्रेय कुलट, किसन गंधाडे, साहेबराव देशमाने, नंदा देशमाने, भरत औटी, समीर आंबे, आनंदा औटी, नीलेेश खोडदे, शिरीष साळवे, मयुर औटी यावेळी उपस्थित होते. 

आमदार औटी म्हणाले, गेल्या चार वर्षांत शिवसेनेने विरोधी पक्षाची भूमिका योग्य पद्धतीने निभावली. निवडणुका जवळ आल्यावर विरोधी पक्षांना संघर्षयात्रांची आठवण झाली. राज्यातील दीनदुबळ्या, उपेक्षित जनतेच्या प्रश्नावर शिवसेनेने सभागृहात, तसेच सभागृहाबाहेर संघर्ष केला. 


सत्ताधारी व विरोधी पक्षाची भूमिका योग्य पद्धतीने निभावल्यामुळे जनतेच्या मनातील पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदभात येत्या १९ तारखेपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात आपण आवाज उठवणार आहोत. दुष्काळाच्या प्रश्नावर आम्हाला राजकारण करायचे नाही. आमची भूमिका नेहमीच सहकार्याचीच असेल.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.