पत्नीला वाचवताना पतीचाही विहिरीत बुडून मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बीड जिल्ह्यातील अाष्टी येथे तलावातील विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेलेली पत्नी पाय घसरून विहिरीत पडल्याने तिला वाचवण्यासाठी पतीनेही विहिरीत उडी घेतली. मात्र दुर्दैवाने दोघांचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना लाेखंडवाडीत रविवारी दुपारी घडली. 
Loading...

लहानू विलास साळुंके (२६) आणि छाया यांचा काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. नगर जिल्ह्यातील साराेळा येथील लहानू हे पत्नी छायासह दिवाळीच्या निमित्ताने लाेखंडवाडी येथे राहत असलेली आजीला भेटण्यासाठी रविवारी आले होते. सकाळी ११ वाजेच्या दरम्यान ते घराजवळच असलेल्या तलावाकडे पाणी आणण्यासाठी गेले. 


विहिरीतून पाणी काढत असताना तोल जाऊन छाया विहिरीत पडली. हे पाहून तिला वाचवण्यासाठी लहानूने विहिरीत उडी घेतली. मात्र बुडून दोघांचाही मृत्यू झाला. अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. अाकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.