मारहाणप्रकरणी मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकरांवर गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- हॉटेलचे काम व्यवस्थित करत नसल्याच्या कारणातून मनसेचे नगर शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर व त्यांच्या गाडीवरील चालकाने दोघांना मारहाण करून जखमी केल्या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला मारहाणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

Loading...


Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, भांड व राशिनकर यांनी भागीदारीमध्ये नगर-औरंगाबाद महामार्गावरील इंद्रायणी हॉटेल चालविण्यासाठी घेतले आहे. शनिवारी दुपारी राशिनकर, त्याचा गाडी चालक दादा पाटोळे हे हॉटेलमध्ये आले होते. दोघे दारू पिवून जेवण करून बसले होते. 


त्याचवेळी राशिनकर यांनी हॉटेलचे व्यवस्थापक सतीष शिंदे याला बोलवून घेवून हॉटेलच्या कामगारांना बोनस का दिला नाही. हॉटेलचे कामकाज व्यवस्थित का करीत नाही, असे म्हणून शिविगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यावेळी भांड हे भांडणे सोडण्यासाठी गेले. त्यावेळी राशिनकर, पाटोळे या दोघांनी भांड यांना शिवीगाळ करून लाथाबुक्कांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Loading...
Powered by Blogger.