शिक्षिकेच्या गळ्यातील हार चोरट्यांनी लांबवला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेरच्या मंगळापूर रस्त्यावरुन आपल्या पतीसोबत मोटारसायकलीवरुन जात असताना मागून येणाऱ्या मोटारसायकलीवरील एका जणाने कांचन अनिल वाकचौरे या शिक्षिकेच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचा राणीहार चोरून पोबारा केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. एकूण ७५ हजार रुपये किंमतीचा हा राणीहार होता. 


Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कांचन वाकचौरे (रा. गणेश विहार, मालदाड रोड, संगमनेर) याठिकाणी आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. त्या शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आपले पती अनिल वाकचौरे यांच्यासोबत मोटारसायकलीवरुन शहरापासून काही अंतरावरच असणाऱ्या मंगळापूर गावाकडे जात होते. 

त्याच वेळी पाठिमागून येणाऱ्या मोटारसायकलीवरील एका जणाने वाकचौरे यांच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचा राणीहार हिसकावून पोबारा केला आहे. त्यावेळी त्यांनी आरडाओरडही केला. पण तोपर्यंत दोघा चोरटयांनी धूम स्टाईलने पोबारा केला होता. एकूण ७५ हजार रुपये किंमतीचा हा राणीहार होता. याप्रकरणी कांचन वाकचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध  दाखल केला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.