इंदोरच्या तरुणाचा खून करणाऱ्या पाच तरुणांना शिर्डीत अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भाईिगरीच्या नशेतून इंदोर शहरात एका तरुणाचा खून करून पाच मित्रांचे टोळके शिर्डीत पळून आले. शिर्डीत आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्यांनी आपली हेअरस्टाईलही बदलली, परंतु, पैशाची चणचण भासल्याने हे खुनी तरुण थेट पोलिसांच्या ताब्यात आले. पाचही तरुणांना शिर्डी पोलिसांनी अटक केली आहे.


Loading...
मध्यप्रदेशातून इंदोर शहरात पंढरीनाथ पोलीस स्टेशनच्या हद्दीत केवळ रागाने पाहिले म्हणूृन भाईिगरीच्या उद्देशाने १८ ते २३ या वयोगटातील तरुणांनी त्यांच्याच गल्लीत राहाणाऱ्या १८ वर्षाच्या तरुणाचा खून केला. नंतर हे पाच तरुण शिर्डीत दाखल झाले होते. याची गुप्त माहिती रात्री उशिरा शिर्डी पोलिसांना मिळाली होती. 

या तरूणांनी शिर्डीत दाखल होताच डोक्याची कटींग करुन चेहऱ्याची वेशभुषा बदलली होती. शिर्डीत दोन दिवसापासून दिपावलीच्या सुट्टीमुळे साईभक्तांची मोठी गर्दी आहे. आपल्याला कोणी ओळखू शकत नाही, असा विश्वास या तरुणांना होता. पैशांच्या अडचणीमुळे ते एका व्याक्तीकडे काही आर्थिक मदत मिळते का याचा प्रयत्न करत होते, परंतु जेथे मदत मागितली त्यानेच पोलिसांना या तरुणांची माहिती दिली. शनिवारी सायंकाळी या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.