भाजप प्रवेश केलेले ते नगरसेवक अडचणीत,उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिका निवडणुकीसाठी भाजपने स्थापन केलेली कोअर कमिटी नावालाच ठरणार आहे. या निवडणुकीची सर्वच धुरा आता पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे या कमिटीतील सदस्यांना आता पालकमंत्र्यांच्या धोरणानुसार निर्णय द्यावे लागणार आहे. 

Loading...

दरम्यान कोअर कमिटीमध्ये पालकमंत्र्यांसह अन्य चार जणांचा समावेश आहे. परंतू या कमिटीला डावलून घडवून आणलेले पक्षप्रवेश आता अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. महापालिकेत एकहाती सत्ता आणण्याच्या दृष्टीने भाजपने प्रयत्न सुरू केले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी तीन ते चार महिन्यापासून भाजपने निवडणूक तयारीला लागले आहे. सांगली व जळगाव पाठोपाठ नगरची महापालिका ताब्यात आणण्याचा चंग बांधला आहे. स्थानिक नेत्यांसह पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच मुख्यमंत्री स्वतः जातीने या निवडणुकीकडे लक्ष देत आहे. त्यासाठी पालकमंत्री शिंदे यांच्यासह शहरजिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, ऍड. अभय आगरकर, किशोर बोरा या पाच जणांचा कोअर कमिटी स्थापन करण्यात आली आहे. 

अन्य पक्षातून भाजप प्रवेश, उमेदवारी, सभा आदींचे नियोजन करण्याची जबाबदारी या कमिटीवर आहे. परंतू या कमिटीला डावलून कोअर कमिटीतील एका सदस्याने अनेकांना उमेदवारीचे आश्‍वासन देवून अन्य पक्षातील कार्यकर्त्यांचे भाजप प्रवेश घडवून आणले आहेत. अर्थात ज्या प्रवेश प्रक्रियेत पालकमंत्री सहभागी आहे. ते वगळून जे प्रवेश आजवर झाले आहेत. ते आता अडचणी येण्याची शक्‍यता असून त्यांना उमेदवारी मिळणार की नाही असा प्रश्‍न उपस्थित होणार आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Loading...
Powered by Blogger.