संगणक चालकाच्या मृत्यूने शिर्डीत खळबळ.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव तालुक्यातील सावळी विहीर ग्रामपंचायतीच्या संगणक चालकाच्या गूढ मृत्यूने खळबळ उडाली आहे. मागच्या ४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्रकाश सोपान वाघमारे (वय २५ रा. सावळीविहीर) याचा मृत्यदेह आढळून आला आहे. प्रकाशचा खून झाला की त्याने आत्महत्या केली? याची चर्चा परिसरात केली जात आहे. 


Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, प्रकाश सोपान वाघमारे हा राहता तालुक्यातील सावळी विहीर बुद्रुक या ग्रामपंचायतीत संगणक चालक म्हणून कार्यरत होता. मंगळवारपासून तो बेपत्ता होता. नातेवाईक त्याचा शोध घेत होते. नातेवाईकांनी शिर्डी पोलिसांशी संपर्क साधला असता तुम्ही शोध घ्या, नाही सापडला तर बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करु, असा सल्ला त्यांनी दिला होता. 


७ तारखेला निमगाव शिवारात शिर्डी पोलिसांना एक बेवारस मृतदेह आढळल्याने त्यांनी साईबाबा रुग्णालयात मृतदेह दाखल केला. प्रकाशचे नातेवाईक शिर्डी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यासाठी आले होते. तेव्हा तो मृतदेह प्रकाशाचा असल्याचे निष्पन झाले. 

त्यानंतर नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी शिर्डी पोलीस ठाण्यात धाव घेऊन प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. प्रकाशाच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश ६ तारखेच्या संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायतीचे कामकाज आटोपून घरी गेला. 


नाईट ड्रेस घालून घरात कोणालाही न सांगता शिर्डीकडे गेला. रात्री ८ वाजताच्या सुमारास निमगाव हद्दीतील एका हॉटेलमध्ये मित्रांसोबत होता. शिर्डी पोलिसांनी यासंदर्भात काही तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.