शिवसेनेने उमेदवारांची यादी जाहीर केल्याने युतीची शक्‍यता धुसर !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात शिवसेनेने आघाडी घेतली असून आतापर्यंत 32 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिली 19 उमेदवारांची पाडव्याची दिवशी जाहीर केली तर दुसरी 13 उमेदवारांची यादी शनिवारी दुपारी जाहीर केली आहे. यादीत विद्यमान 14 उमेदवारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून दोन माजी नगरसेवकांचा समावेश आहे. 


Loading...
दरम्यान, एकीकडे युतीची बोलणी सुरू असल्याचे शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड सांगत असतांना दुसरीकडे मात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे युतीबाबत प्रश्‍न चिन्ह उभे राहिले आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवारांची पहिली व दुसरी यादी राठोड, नगर दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या स्वाक्षरीने जाहीर केली. त्या शिवसेनेने प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

शिवसेनेने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली खरी पण दुसरीकडे भाजपबरोबर युती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राठोड यांनी युती करण्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. असे असतांना शिवसेनेने उमेदवारांची यादी जाहीर केल्याने युतीची शक्‍य आता धुसर झाल्याचे दिसत आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.