पोस्ट ऑफिसमध्ये रोज ५५ रुपये भरून मिळवू शकता १० लाख रुपयांचा विमा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- या महिन्यात पोस्ट ऑफिसची बँक लॉन्च होत आहे. पण, तुम्हाला हे माहित आहे का की पोस्ट ऑफिसमधून तुम्हाला विमाही मिळतो. भारतात ब्रिटीश शासन असताना १ फेब्रुवारी १८८४ मध्ये पोस्टल लाइफ इनश्युरन्स म्हणजे पीएलआय सुरू झालं होतं. ही भारतातील सर्वात जुनी विमा योजना आहे.
Loading...

आज पीएलआय योजने अंतर्गत ४३ लाखांहून अधिक पॉलिसी होल्डर आहेत. या योजने अंतर्गत तुम्ही १० लाखापर्यंतची विमा पॉलिसी घेऊ शकता.

पीएलआयचा इतिहास- १८९४ मध्ये या विमा योजनेअंतर्गत पोस्टल आणि टेलीग्राफ विभागातील महिला कर्मचाऱ्यांना विमा कव्हर देण्यात आला होता. हा तो काळ होता जेव्हा दुसरी कोणतीही विमा कंपनी महिलांन विमा योजना देत नव्हती.

पोस्ट ऑफिस PLI अंतर्गत ३ प्रकारचे योजना उपलब्ध आहेत. Whole Life Assurance (Surksha): PLI च्या या योजनेला सुरक्षा या नावानेही ओळखले जाते. ही एक अशी योजना आहे ज्यात विमा ग्राहकाच्या मृत्यूनंतर मिळणारा बोनस आणि निश्चित रक्कम नॉमिनीला दिली जाते. 


ही पॉलिसी घेण्यासाठी कमीत कमी वय १९ वर्ष आहे आणि जास्तीत जास्त वय ५५ वर्ष आहे.PLI च्या या योजनेअंतर्गत कमीत कमी निश्चीत रक्कम २० हजार रुपये आणि जास्तीत जास्त १० लाख रुपये आहे.


Endowment Assurance (Santosh): Postal Life Insurance च्या या योजनेला संतोष नावानेही ओळखले जाते. या योजनेअंतर्गत विमादात्याला ठरावीक रक्कम देण्याचे आश्वासन देण्यात येते. या दरम्यान विमादात्याचा अचानक मृत्यू झाला तर नॉमिनीला ती रक्कम आणि बोनस देण्यात येतो.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.