ईशा अंबानीची ‘महागडी’ लग्नपत्रिका; किंमत वाचून बसेल धक्का …


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अर्थात मुकेश अंबानी यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरु आहे. मुकेश यांची मुलगी ईशा अंबानीचा आनंद पिरामलसोबत १२ डिसेंबरला शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. उदयपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या ग्रँड विवाह सोहळ्याला मनोरंजन आणि उद्योग जगतातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे. 

Loading...
मात्र, सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती ईशा अंबानीच्या शाही आणि महागड्या लग्नपत्रिकेची. ईशा अंबानीची लग्नपत्रिका म्हटलं म्हणजे ती खास असणारच. या लग्नपत्रिकेची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. उपलब्ध माहितीनुसार, ईशाच्या एका लग्नपत्रिकेची किंमत सुमारे ३ लाख रुपये इतकी आहे. 

काही खास पाहुण्यासांठीच ही शाही पत्रिका तयार करण्यात आल्याचं समजतंय. पत्रिकेतील रंगसंगती, त्याचं डिझाईन याचंही नेटिझिन्सकडून कौतुक होत आहे. या रॉयल लग्नपत्रिकेचा एक व्हिडिओसुद्धा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.