भाजपच्या आमदाराकडून भर सभेत राडा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- धुळे महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवल्यामुळे नाराज झालेले भाजपचे आमदार अनिल गोटे, यांनी धुळ्यात भाजपचीच सभा उधळून लावली. भाजपने आमदार गोटे यांना डावलून धुळे पालिका निवडणुकीचे सर्वाधिकार गिरीश महाजन यांना दिल्यामुळे संतप्त झालेल्या आमदार गोटे यांनी भाजपने आयोजित केलेला मेळावा उधळून लावला. 

यावेळी भर मंचावरच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहायला मिळाला. महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी धुळ्यातील जे. बी. रोडवर भाजपचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. 

महापालिका निवडणुकींपासून दूर ठेवल्यामुळे संतप्त झालेल्या गोटे यांनी थेट मंचावर जात रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांच्याकडून माईक हिसकावून घेत, सभेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे महाजन आणि दानवे यांचे समर्थक आणि आमदार गोटे यांच्यात बाचाबाची झाल्याचंही बोललं जात आहे.

यामुळे गोटे समर्थक आणि दानवे तसंच महाजन यांच्या समर्थकांमध्ये रेटारेटी सुरु झाली. कार्यकर्त्यांच्या आपापसातील बाचाबाचीमुळे स्टेजवरील वातावरण अचानक तापले. अखेर पोलीस आणि कार्यकर्त्यांनी गोटे आणि त्यांच्या समर्थकांना यांना स्टेजवरुन खाली आणले. त्यानंतर पक्षातील विरोधकांनी आमदार गोटे यांना त्याठिकाणाहून हुसकावून लावले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Loading...
Powered by Blogger.