शॉर्टसर्किट मुळे दोन एकर ऊस जळाला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यातील जवळा येथील संभाजीराव सालके यांच्या घोडोबा येथील उसाला शनिवार सायंकाळी पाच वाजता विजेचे शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. आग लागल्याचे समजताच सोशल मीडियाच्या माध्यमातून रामदास घावटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदतीसाठी संदेश पाठवले. 
Loading...

दहाच मिनिटांत सुमारे चाळीस ते पन्नास युवक घटनास्थळी मदतीसाठी आले. पाणी, माती व झाडाचा पाल्याच्या साहाय्याने आग शमवण्यात केली. त्यामुळे तीन एकरांवरील ऊस वाचला. दोन एकरांवरील ऊस मात्र जळाला. घावटे यांनी तहसीलदार गणेश मरकड यांच्याशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी तातडीने कामगार तलाठ्यांना पंचनामा करून अहवाल पाठवण्याच्या सूचना दिल्या.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.