मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर पालकमंत्री शिंदे सक्रिय !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर शहरातील भाजपच्या राजकारणापासून स्वतःला दूर ठेवणारे पालकमंत्री राम शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या तातडीच्या बैठकीनंतर मनपा निवडणुकीत सक्रिय झाले. त्यांनी आपल्या संपर्क कार्यालयात निवडणुकीचा आढावा घेतला. 

Loading...
उमेदवारीकरिता वशिला लावण्यासाठी पालकमंत्र्यांच्या कार्यालयात स्वपक्षाबरोबर अन्य पक्षांतील इच्छुकांनीही हजेरी लावत मोर्चेबांधणी सुरू केली. शिवसेनेच्या नेत्यांनीही शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली, मात्र ती युतीबाबत होती की, अन्य कुठल्या विषयांवर हे मात्र पालकमंत्री व सेनेच्या नेत्यांनी गुलदस्त्यात ठेवले. 

त्यामुळे दोन्ही पक्षांमधील इच्छुकांत संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष व काही वर्षांपासून भाजपमधून बाहेर असलेले वसंत लोढा व काँग्रेसचे उबेद शेख यांनीही याच दिवशी पालकमंत्र्यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.

महापालिका निवडणुकीसाठी प्रदेश भाजपने कोअर कमेटी स्थापन केली आहे. या कमेटीत पालकमंत्री शिंदे, खासदार तथा शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी,आमदार सुरजितसिंग ठाकूर, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक व शहर सरचिटणीस किशोर बोरा यांचा समावेश आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.