कांद्याच्या पिकाला फुटले मोड, नुकसान भरपाईची मागणी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यातील पळशी येथील शेतकरी सुदाम ममता शिंदे यांनी त्यांच्या शेतात ६ गुंठे क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती. हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला, म्हणून गावातील एका कृषी सेवा केंद्रातून क्लोरोपायफास ५० टक्के आणि स्मॅश डायक्लोरोवोस ७६ टक्के विकत घेऊन त्यांनी ते जमिनीत सोडले. 
Loading...

तथापि, त्यामुळे कांदापिकात विकृती तयार झाल्याने या औषधाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. कांद्यास मोड फुटले असून ४ गुंठ्यावरील पिकाचे नुकसान झाले आहे. या औषधाचे प्रयोगशाळेत परीक्षण करुन नुकसान झालेल्या नुकसानीचा पंचनामा करुन दोषींवर कारवाई करून भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.