दरोडेखोरांची टोळी गजाआड.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दरोडा टाकून ९१ हजार ९६० रुपये लांबवणारी दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गजाआड केली. ही घटना १६ ऑक्टोबर २०१८ ला मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी शेतकरी नवनाथ रामभाऊ पालवे (६८, माणिकदौंडी रोड, पाथर्डी) यांच्या फिर्यादीनुसार शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
Loading...

राजू विनायक पगारे (३५, मजलेशहर, ता. शेवगाव), गोकुळ भानदास पगारे (३७, मजलेशहर, ता. शेवगाव), संजय बाबासाहेब पवार (२८, भायगाव, ता. शेवगाव), अशोक मनोहर कचरे (२७, नवीन दहिफळ, ता. शेवगाव) व शिवाजी पंडित गोलवड (२७, नवीन दहिफळ, ता. शेवगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.