राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविकेचा भाजपात प्रवेश.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सावेडी उपनगर मधील प्रभाग क्रमांक सात मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सुनीता भिंगारदिवे, माजी नगरसेवक किसान भिंगारदिवे यांनी समर्थकांसह भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर व शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत खासदार संपर्क कार्यालय येथे हा पक्षप्रवेश झाला. 
Loading...

यावेळी गटनेते सुवेंद्र गांधी, शहर सरचिटणीस किशोर बोरा, पोपट कोलते, कमल कोलते, संकेत भिंगारदिवे, शरद बारस्कर, दत्तात्रय बारस्कर, साहेबराव काते, बबन गोसकी, राजू भिंगारदिवे, करण सातूरे, राणी भिंगारदिवे आदींसह मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.