महापौर, उपमहापौर, पदासह सर्व पदे भाजपकडे असतील !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- देशात व राज्यात झालेल्या विकासामुळे जनतेने भाजपला मतदान करण्याचे ठरवले आहे. नगर महापालिकेतील महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती पदासह सर्व पदे भाजपकडे असतील असे नियोजन केले आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुरजितसिंह ठाकूर यांनी केले. सावेडी उपनगरातील प्रभाग क्रमांक सातमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता भिंगारदिवे, माजी नगरसेवक किसन भिंगारदिवे यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. 
Loading...

आमदार ठाकूर व शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थितीत खासदार संपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश झाला. यावेळी नगरसेवक सुवेंद्र गांधी, शहर सरचिटणीस किशोर बोरा, पोपट कोलते, कमल कोलते, संकेत भिंगारदिवे, शरद बारस्कर, दत्तात्रय बारस्कर, साहेबराव काते, बबन गोसकी, राजू भिंगारदिवे, राणी भिंगारदिवे आदी उपस्थित होते. 

आ. ठाकूर म्हणाले, भाजप आज संपूर्ण महाराष्ट्रात क्रांतिकारक काम करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर प्रत्येक निवडणुका स्वबळावर जिंकल्या आहेत. आता नगरची महापलिका जिंकण्याच्या उद्देशानेच भाजप निवडणूक रिंगणात उतरत आहे. इतर पक्षांतून भाजपमध्ये आलेले नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा उचित सन्मान करण्यात येईल. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.