जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शासनाने अकरा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जी परिस्थिती एप्रिल -मे महिन्यांत ओढवली जाते, ती आता ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्येच जाणवत आहे. सध्या जिल्ह्यातील २ लाख २३ हजार ७०१ लोकांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. याशिवाय मागेल तेथे टँकरची सुविधा देणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. 
Loading...

पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई जाणवत आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत पाथर्डी तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. या तालुक्यांत सर्वाधिक ४० गावांमध्ये टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. पाथर्डी तालुक्यातील ४० गावांसह २२४ वाड्या-वस्त्यांवर देखील टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. 

पाथर्डीखालोखाल संगमनेर तालुक्यात पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे प्रशासनाने तेथेही उपाययोजना सुरु केल्या आहेत. संगमनेर तालुक्यातीत २३ गावांमध्ये टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. तसेच या तालुक्यातील ८४ वाड्या-वस्त्यांवर पिण्याचे पाणी टँकरमधून पुरवले जात आहे.

पारनेर तालुक्यात २१ गावांमध्ये व १२२ वाड्या-वस्त्यांवर टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. पारनेर तालुक्यातील सुमारे ४७ हजार ८३४ लोकसंख्या टँकरद्वारे उपलब्ध होणाऱ्या पिण्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. पारनेर तालुक्यात १ शासकीय तर २२ खासगी टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवठा करत आहेत. 

तिन्ही तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. इतर तालुक्यांत हे प्रमाण नगण्य आहे. याशिवाय कोपरगाव तालुक्यातील एका गावातील २ हजार ५५० लोकसंख्येला एका टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. नगर तालुक्यात ४ गावंमध्ये व १५ वाड्या-वस्त्यांवर टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.