जहागीरदार सह चार जणांवर दोन वर्षांसाठी तडीपारीची कारवाई.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पोलीस प्रशासनाने चार जणांवर दोन वर्षांसाठी तडीपारीची कारवाई केली आहे. 15 दिवसांतच हद्दपारीची ही दुसरी कारवाई आहे. यामध्ये बंटी जहागीरदार यासह चार जणांचा समावेश आहे.

Loading...
हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये अस्लम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार (वय 44, रा. जहागीरदार बिल्डिंग, जामा मस्जिद जवळ), शरीफ लतिफ शेख (वय 33, रा. वॉर्ड नं. 2 बजरंग चौक), आशू लियाकत पठाण (वय 25, रा. पाण्याच्या टाकीजवळ वॉर्ड नं. 2), इरफान उर्फ खपक्या गनी शेख (वय 21, रा. वॉर्ड नं. 2 श्रीरामपूर) यांचा समावेश आहे. 

कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणार्‍यांवर पोलीस प्रशासनाने हद्दपारीची कारवाई सुरू केली आहे. मागील आठवड्यात श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातून 5 जण हद्दपार करण्यात आले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.