खा.गांधी-अ‍ॅड. आगरकर यांच्यातील वाद मिटविण्यासाठी मुंबईत बैठक


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- वास्तव पाहा आणि त्यानुसारच काम करा. आपली स्थिती चांगली आहे, पण तुम्ही म्हणता तेवढी चांगली करायची असेल, तर सर्वांना एकत्रच काम करावे लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरच्या निवडणूक समितीचे कान टोचले. 

Loading...
महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक समितीचे सदस्य पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, ज्येष्ठ नेते अ‍ॅड़. अभय आगकर, शहर सरचिटणीस किशोर बोरा यांच्यासह ज्येष्ठ नेते सुनील रामदासी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी पक्षाचे निरीक्षक आमदार सुरजितसिंह ठाकूर उपस्थित होते. 

वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीत फडणवीस यांनी विद्यमान राजकीय परिस्थितीचा आढावा घेत पक्षाकडून सुरु असलेल्या तयारीबाबत काही प्रश्‍न उपस्थित केले. शिवसेनेने उमेदवारांची यादी घोषण करण्यास सुरुवात केल्यामुळे त्यांच्यासमवेतच्या युतीबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे समजते. एवडेच नव्हे, तर शिवसेनेने तब्बल 32 उमेदवार जाहीर केल्यामुळे त्यांच्यासमवेत युती होण्याची शक्यता पूर्ण मावळली असल्याचे एका नेत्याने सांगितले. 

आढावा घेताना महापालिकेत निवडून येणार्‍या नगरसेवकांची संख्या 35 ते 37 असल्याची माहिती एका नेत्याने दिली. त्यावर मुख्यमंत्री यांनी कान टोचले. ते म्हणाले, आपली स्थिती चांगली आहे, पण वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जी काही तयारी करायची आहे, ती वास्तव लक्षात घेऊनच करा. आपण म्हणता त्या वास्तवापर्यंत जाण्यासाठी कुणा एकट्याचे काम नाही. त्यासाठी सर्वांनाच बरोबर घ्यावे लागेल. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कान टोचल्यामुळे शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी आणि माजी शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर यांच्यातील एकीसाठी आता वरिष्ठ पातळीवरूनच प्रयत्न होण्याची शक्यता आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.