सोन्याचे आमिष देवून लुटणारी टोळी जेरबंद


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखुन लुटणार्‍या सराईत गुन्हेगारीच्या टोळीला तसेच संभाजीनगर जिल्हयातील मोक्कातील फरार गुन्हेगार गौतम काळे यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. 

Loading...
दरम्यान, या घटनेचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक बनून या घटनेचा पर्दाफाश केला आहे. आरोपींमध्ये केदार प्रल्हाद मोहितें (वय 36, चाळीसगाव,जि.जळगांव), गौतम काळे व अजबे महादू भोसले (रा.गंगापुर, संभाजीनगर)याचा समवेश आहे.

गोविंद रुजे (रा.भोसरी पुणे) हे 9 ऑक्टोबर रोजी झापवाडी शिवरात पुलाजवळ थांबले असताना त्यांच्या तोंड ओळखीच्या इसमाने त्यांना खोदकाम करताना आम्हाला 1 किलो सोने सापडलेले असून ते तुम्हाला स्वस्तात विकत देतो, असे सांगून अज्ञात आरोपींनी त्यांना 5 लाख रुपयांना लुटले होते. त्यावरुन सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिलेल्या आदेशानंतर स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाच्या पथकाने नाशिक येथून केदार मोहीते यास सापळा रचून मोठ्या शिताफीने पकडले. सदरचा गुन्हा हा पानसवाडी तालुका नेवासा येथील गौतम काळे व त्यांच्या जावयाच्या मदतीने केला असल्याची त्याने कबुली दिली. 


पोलिसांनी गौतम काळे यांला पकडण्यासाठी जाळे रचले. पोलीस निरिक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने तयारी करुन 10 ऑक्टोबर रोजी बनावट ग्राहक बनून स्वतः पोलीस निरिक्षक व पोलीस नाईक मल्लिकार्जुन बनकर व दिगंबर कारखीने व रवींद्र कर्डिले असे बनावट ग्राहक बनून जाणारी एक टीम व सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक कैलास देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली दुसरी टीम करुन शेतात दबा धरुन बसले. 

त्यानंतर गौतम काळे हा व त्याच्या सोबत एक इसम हातात स्टिलची कळशी घेवून त्यामध्ये बनावट पिवळ्या धातूच्या अंगठ्या घेऊन आला. त्याक्षणीच दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी त्यांना पकडले. त्याच्या कब्जातून स्टिलची कळशी व बनावट अंगठ्या हस्तगत केल्या.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.