कर्डिलेंच्या फराळ कार्यक्रमात पालकमंत्री शिंदे,सुजय विखे यांच्यासह सर्वपक्षीय हजर


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आमदार शिवाजी कर्डिले यांनी बुर्हाणनगर येथील निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी-पाडवा फराळ कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती लावली. कर्डिले गेल्या २५वर्षापासून हा आयोजित करतात. सणाचा आनंद या माध्यमातून द्विगुणित केला जातो. 

Loading...

या फराळ कार्यक्रमास पालकमंत्री राम शिंदे, खा. दिलीप गांधी, आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, आ. राहुल जगताप, डॉ. सुजय विखे, प्रा. भानुदास बेरड, बाजीराव खेमनर, पोपट पवार, पांडुरंग अभंग, दादा कळमकर, नामदेव राऊत, करण ससाणे, माधवराव लामखडे, संजय कळमकर, सचिन पारखी, बाबूशेठ बोरा, नंदलाल कोठारी, सुनील काळे, माणिक विधाते, महेश तवले, संपत नलवडे, निखील वारे, बाळासाहेब पवार, अंबादास पंधाडे, मनेष साठे, श्याम पिंपळे, विश्वनाथ कोरडे, रवींद्र कडुस, संपत बारस्कर, कुमार वाकळे, शिवाजी चव्हाण, संजय ढोणे, अशोक गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. 

यावेळी बोलताना आ. कर्डिले म्हणाले, सर्वसामान्य जनतेच्या अलोट प्रेमामुळेच मी २५वर्षे आमदार आहे. जनतेच्या प्रेमामुळेच इथपर्यंत मला पोहोचता आले. रोज सकाळी ७ वाजल्यापासून समाजाचे प्रश्न सोडवित असल्यामुळे मतदारसंघाचे विभाजन होऊनही जनतेने मला आमदार म्हणून निवडून दिले आहे. 

दिवाळी पाडवा हा सण प्रत्येकाच्या घरी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु दिवाळीच्या दुसर्या दिवशी मी सालाबादप्रमाणे फराळाच्या कार्यक्रमाचे आयोजन करतो. या कार्यक्रमामध्ये जिल्हाभरातून मोठ्या संख्येने गावातील गावकरी, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, अधिकारी, युवक वर्ग, महिला वर्ग येत असतात. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.