श्रीगोंद्यात अपघातात दुचाकीवरील दोघे ठार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-दौंड मार्गावर कोळगाव फाट्याजवळ गुरुवारी (दि.8) सायंकाळी साडेचार वाजता भीषण अपघात झाला. या अपघातात सखाहरी गोविंद नानकर (वय 50) व रामेश्वर गबाजी मेनगर (वय 40, दोघेही रा. कडीत कुळ बुद्रुक, ता. श्रीरामपूर) या दोघा दुचाकीस्वारांचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला.
Loading...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुरुवारी (दि.8) श्रीरामपूर तालुक्यातील सखाहरी नानकर व रामेश्वर मेनगर हे दोन दुचाकीवर बारामती येथील बागिरदर्गा येथे देवदर्शनाला चालले होते. 

गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास हे दोघे दुचाकीस्वार तालुक्यातील कोळगाव फाट्याजवळ जवळून चालले असताना नगर-दौंड महामार्गावर दुचाकीला(क्रमांक एम एच-17-एक्स-4388) एका अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.