दक्षिणेतील मतदारांची विखे पाटील परिवाराने माफी मागावी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आपले आजोबा आठ वेळा खासदार झाले. वडील आमदार, मंत्री झाले, आता विरोधी पक्षनेते आहेत. मातोश्री जिल्हा परिषदेच्या दोनदा अध्यक्षा झाल्या. सुजय विखे हे पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष आहेत. आता आपणास दक्षिणेतून खासदार होण्याचे डोहाळे लागले आहेत.
Loading...

एका बाजूला सांगतात मी प्रस्थापितांच्या विरोधात आहे आणि दुसर्‍या बाजूला 40 वर्षापासून आपल्या घरात घराणेशाही नांदत आहे, मग ही दिशाभूल कशासाठी ? असा सवाल करत सेनेचे घनश्याम शेलार यांनी सुजय विखेंच्या दक्षिण वारीवर घणाघात केला. 

डॉ सुजय विखे यांनी खा. दिलीप गांधी हे बोगस खासदार आहे असा आरोप वाळकी व पाथर्डी येथे केला. सन 1999 ला आपले आजोबा स्व. बाळासाहेब विखे यांनी माझे खासदारकीचे जाहीर झालेले तिकीट कापले आणि दिलीप गांधी यांना भाजपाचे तिकीट मिळून दिले. मग नगर दक्षिणवर बोगस खासदार कोणी लादला? असा सवाल शिवसेना नेते घनश्याम शेलार यांनी श्रीगोंद्यात बोलताना केला.

शेलार म्हणाले,मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने राजीव राजळे यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली, त्यावेळी राजळेंना पाडण्यासाठी विखे परिवाराने एक अपक्ष उमेदवार उभा केला आणि पुन्हा एकदा खा. गांधीना खासदार करण्यासाठी खतपाणी घातले. हे बोगस प्रॉडक्ट्स आपणच लॉच केले, यावर दक्षिणेतील मतदारांची विखे परिवाराने माफी मागावी, असा टोला शेलार यांनी लगावला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.