शेतीसाठी पाणी उपसताना दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी नगरपंचायतीच्या ड्रेनेजमधून शेतीसाठी पाणी उपसताना दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला. शिर्डीतील कालिकानगर भागात शनिवारी या शेतकर्‍यांचा विषारी गॅसमुळे गुदमरून मृत्यू झाला आहे. त्यांना वाचविण्यासाठी गेलल्या तरुणालाही विषारी वायूची बाधा झाली.

Loading...
पंधरा ते वीस फूट खोल ड्रेनेजमध्ये पडून संदीप अशोक कोते (वय ४८) व गंगाधर गाडेकर (वय ४२) यांचा मृत्यू झाला. या दोघांना बाहेर काढण्यासाठी प्रथम नगरपंचायतचे पथक आले; मात्र, पुरेसे साहित्य नसल्याने त्यांना यश आले नाही. 

त्यानंतर साईबाबा संस्थानचे पथक आले. पथकाने दोघांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले; मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

शिर्डीच्या आसपास ऊस आणि अन्य शेती आहे. पाणी टंचाई असल्याने शेतकरी नगरपंचायतीच्या ड्रेनेजलाइनमध्ये पंप टाकून पाणी उपसतात आणि ते शेतीला देतात. कोते आणि गाडेकर पंप सुरू करण्यासाठी गेले असता ड्रेनेजमध्ये गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.