भाऊबीजेच्या दिवशीच बहिणीसमोर भावाचा निर्घृण खून


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भाऊबीजेच्या दिवशीच गुंडांनी एका बहिणीला कधीही न विसरता येण्यासारखी जखम दिलीय. गाझियाबादमध्ये या सणाच्या दिवशीच दिवसाढवळ्या काही गुंडांनी एका बहिणीच्या डोळ्यांदेखत तिच्या भावाची गोळ्या घालत निर्घृण हत्या केलीय. ही घटना कवी नगर भागात घडलीय. 
Loading...

या घटनेनंतर या कुटुंबावर दु:खाचं आभाळ कोसळलंय. मनोज हा तरुण आपल्या बहिणीला तिच्या सासरहून माहेरी घेऊन जाण्यासाठी आला होता. बहीण-भाऊ ग्रेटर नोएडाहून आपल्या घरी परतत होते. पण, रस्त्यातच काही बाईकस्वार गुंडांनी त्यांचा रस्ता रोखत त्यांची लूटमार करू लागले. 


मनोजनं याचा विरोध केला असता गुंडांनी त्याच्यावर गोळी झाडली. बहिणीच्या शरीराला खेटून गेलेली ही गोळी तिच्या भावाला लागली. त्यानंतर गुंडांनी घटनास्थळावरून पळ काढला. मनोजला गंभीर अवस्थेत सर्वोद्य रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु, इथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.