खुशखबर नेटफ्लिक्स आता येतंय मराठीत !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मनोरंजन क्षेत्रात 2018 हे वर्ष वेब सिरिज साठी ओळखलं जातंय. या वर्षात खूप चांगल्या वेब सिरिज प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या. सिनेमा आणि मालिकांना एक सक्षम पर्याय म्हणून याकडे पाहिलं जातंय. या सर्वात नेटफ्लिक्सच्या वेबसिरीज सर्वाधिक चर्चेत राहिल्या. 
Loading...

सेक्रेड गेम्सची उत्सुकता तर अजूनही राहिलीचं आहे. आता तरं नेटफ्लिक्सचं नवं पर्व लवकरच रसिकांच्या भेटीला येतयं. बाहुबली-१च्या प्रिक्वेलसह अनेक नव्या वेबसिरीज आणि सिनेमांची घोषणा नेटफ्लिक्सने केलीय.

१७ नवीन सिनेमांची घोषणा नेटफ्लिक्सने केली असून त्यापैकी नऊ प्रोजेक्ट भारतात आहेत. यांत मराठी सिनेमांचाही समावेश आहे. बाहुबली- बीफोर द बिगिनिंग सीरीज स्वरूपात भेटीला येणार आहे. शिवगामी आणि तिच्या साम्राज्याच्या उदयाची कथा असेल.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.