रोटरी तर्फे स्वच्छता सेविकांना साड्या -फराळ वाटप करीत आगळी वेगळी भाऊबीज


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी व इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शेवगाव नगर परिषदेमधील स्वच्छता सेविका व इतर गरजू अश्या एकूण 70 महिलांना साडी चोळी व फराळ वाटप शनिवारी ( दि. 10 ) शेवगाव येथे आगळी वेगळी दिवाळी भाऊबीज साजरी केली. 
Loading...

शहरातील स्वराज मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शेवगाव नगर परिषदेचे मुख्याध्याकारी अंबादास गरकल यांचे हस्ते स्वच्छता सेविका व इतर गरजू महिलांना साडी चोळी व फराळ वाटप करण्यात आले. रोटरीचे सहप्रांतपाल उद्धव शिरसाठ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

भाऊबीजेनिमित्त आगळ्या वेगळ्या सन्मानाने स्वच्छता सेविका आंनदून गेल्या. या उपक्रमासाठी सर्व रोटरी व इनरव्हील सदस्यांनी व काही कापड दुकानदारांनी मोफत साड्या व फराळ दिले. स्वच्छता सेविका या खऱ्या स्वचछता दूत असून त्यांचा केलेला सन्मान आनंद देणारा आहे. यापुढील काळात त्यांच्या आरोग्याबाबत रोटरी व इंनेरव्हीलच्या सहकार्याने उपाययोजना करण्यात येईल व त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी ग्वाही मुख्याधिकारी गरकल यांनी दिली. 

रोटरी तर्फे 11 जिल्ह्यात गरजू महिलांसाठी वंचिताचे दारी भाऊबीजेला रोटरी हा उपक्रम प्रांतपाल विष्णू मोंढे यांनी हाती घेण्यात आला व हजारो भगिनींना साड्या वाटप् केल्याचे सहप्रांतपाल शिरसाठ यांनी सांगितले. रोटरी क्लब चे अध्यक्ष प्राचार्य दिलीप फलके यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संजय लड्डा यांनी स्वच्छता सेविकांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. 

या वेळी रोटरीचे सचिव मनेश बाहेती, भागनाथ काटे, डॉ. आशिष लाहोटी,डॉ. पुरुषोत्तम बिहानी, अण्णासाहेब दिघे, प्रवीण लाहोटी , विजय शिंदे, नितीन भुसारी, राजीव रसाळ, आशिष तोतला इनरव्हीलच्या अध्यक्षा लीना साबलोक, सचिव डॉ. मनीषा लड्डा, राजश्री रसाळ,रुपाली तडवळकर,डॉ प्रीती राठी,गीता बाहेती आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रा किसनराव माने तर आभार दीपक तागड यांनी केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.