अहमदनगर मनपा निवडणूक : मुख्यमंत्र्यांनी घेतला निवडणुकीचा आढावा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मनपा निवडणुकीसंदर्भात कोअर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी आ.ठाकूर यांच्यासह समितीचे सर्व सदस्य, माजी शहराध्यक्ष सुनील रामदासी आदी उपस्थित होते. 
Loading...

बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शहरातील एकूण राजकीय परिस्थितीचा, पक्षाकडून सुरु असलेल्या तयारीचा आढावा घेतला. शिवसेनेशी संभाव्य युतीबाबतही बैठकीत चर्चा झाल्याची चर्चा आहे. 


मात्र, शिवसेना व भाजप स्बळाच्या दिशेने बरेच पुुढे गेले असल्याने युतीबाबत फारशी चर्चा झाली नसल्याचे सदस्यांकडून सांगण्यात येत आहे. शहरातील पक्ष पातळीवरील मतभेद बाजूला ठेवून एकत्रित काम करा, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचेही समजते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.