मरणानंतरही संपेनात नशिबातील यातना


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- हयातभर गावात स्मशानभूमी व्हावी, यासाठी पाठपुरावा करावा व स्वतःच्याच अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसावी, यापेक्षा दुर्दैव ते काय असावे. याचाच प्रत्य पुनतगाव येथील विठ्ठल रामभाऊ गंधारे यांच्या कुटुंबीयांना आला. 

Loading...
गावात स्मशानभूमी व्हावी, यासाठी गंधारे यांनी पाठपुरावा केला. मात्र त्यांचा मृत्यू झाल्यानंतर रस्त्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्या कुटुंबीयांवर आली. त्यामुळे स्मशानभूमीचा प्रश्‍न येथे पुन्हा ऐरणीवर आला आहे.

गवात स्मशानभूमी व्हावी, यासाठी अखेरपर्यंत लढा देणारे विठ्ठल रामभाऊ गंधारे यांचे सोमवारी निधन झाले. आत्तापर्यंत येथील ग्रामस्थ नदीतच अंत्यविधी करत होते. मात्र जायकवाडी धरणात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदी दुथडी वाहत आहे. स्मशानभूमीच नसल्याने गंधारे यांचा अंत्यविधी पुनतगाव -खुपटी या मुख्य रस्त्यावरच करावा लागला.

पुनतगाव हे नेवासे-श्रीरामपूर तालुक्‍यातील शेवटचे टोक असलेले सीमेवरील गाव. येथे सर्व जाती-धर्मातील लोक असून गाव जरी छोटे असले तरी राजकीयदृष्ट्या महत्वाचे आहे. या गावातील पुढाऱ्यांनी आत्तापर्यंत अनेक महत्वाची राजकीय पदे भोगली आहेत. 


तरीही हे गाव विकासापासून वंचित आहे. प्रवरा नदीच्या काठावर वसलेल्या या गावची लोकसंख्या 3000 ते 3500 हजार आहे. प्रवरा नदीला पाणी असल्यास येथील नागरिकांना नदीच्या काठावर व रस्त्याच्या कडे- काठावर अंत्यविधी करण्याची वेळ येते. यामुळे येथील ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.