अहमदनगर मनपा निवडणूक : कॉंग्रेसला राष्ट्रवादीच्या खेळीची भीती !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचा निर्णय झाला, तरी सर्वाधिक फायदा राष्ट्रवादीला होईल, असे चिन्ह आहेत. राष्ट्रवादीचे शहरातील संघटने हे कॉंग्रेसपेक्षा अधिक प्रबळ आहे. कॉंग्रेसकडून इच्छुक असलेले राष्ट्रवादीच्याही अधिक संपर्कात आहेत. 
Loading...

आमदार संग्राम जगताप यांचा शब्द कॉंगेसमधील “यंग’ अधिक ऐकतात, हाही इतिहास आहे. प्राबल्य असलेल्या प्रभागातमध्ये राष्ट्रवादी अपक्ष देऊन खेळ करू शकते, ही भीती कॉंग्रेसला आहे. त्यामुळे आघाडीचा निर्णय घेताना राष्ट्रवादीला अधिकच विश्‍वासात घेऊन करावी लागणार असल्याचे कॉंग्रेसमधील जाणकारांचे म्हणणे आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.