डॉ. सुजय विखे पाटलांनी अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- डॉ. विखे हे अद्याप ग्रामपंचायत सदस्य नाहीत. पालकमंत्री शिंदे यांची कामे व उंची मोठी आहे. त्यांच्यावर टीका करण्याची योग्यता डॉ. सुजय विखे यांची नाही. पालकमंत्री शिंदे यांचे पाय जमिनीवर आहेत. ते सतत जनतेमध्ये असतात. 
Loading...

कर्जत जामखेड मतदारसंघात गेल्या ५० वर्षात कधी नव्हे ते कोट्यवधीं रुपयांची विकासकामे चालू आहेत. नगर दक्षिणची जनता बाहेरील पार्सल कधीही स्वीकारणार नाही. हा भाजपचा बालेकिल्ला आहे. तो तसाच अबाधित राहणार आहे. 

डॉ. सुजय विखे यांनी अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नये. निवडणूक रिंगणात भाजप सेनेची ताकद दाखवून देऊ, यापुढे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यावरील टीका खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही डॉ. भगवान मुरूमकर यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

विखे यांनी भाषणात सांगितले की, 'पालकमंत्री शिंदे ६० हजारांच्या मताधिक्क्याने पराभूत होतील. परंतु आमची निवडणुकीसाठी कधीही तयारी आहे. निवडणूक कधीही होऊ द्या, समोर उमेदवार कोणीही असून द्या, पालकमंत्री शिंदे हे ५० हजारांच्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, 'जामखेड तालुक्यातील जातेगाव, मोहरी, पिपंळगाव आवळा, हळगाव, पाटोदा येथील विकासकामे ही पालकमंत्री शिंदे यांच्या पाठपुरवठ्यामुळे मंजूर झाली आहेत. पालकमंत्री शिंदे हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष आहेत. 

आणि सर्व डीपीडीसी कामांचा निधी त्याच्या अध्यक्षतेखाली मंजूर होतो. जामखेड तालुक्यातील सर्वच कामांचा निधी पालकमंत्री शिंदे यांच्या प्रयत्नाने प्राप्त झाला आहे. अशा कामांचे भूमिपूजन करण्याचा अधिकार डॉ. सुजय विखे याना नाही. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.