कर्जत-जामखेड मतदारसंघावर अजित पवारांचे लक्ष !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी हाती घेत आहे. लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. लोकसभेत जास्तीत जास्त जागा जिंकायच्या या दृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेसने तयारी सुरू केली आहे. त्यानुसार राष्ट्रवादीने विधानसभा मतदारसंघनिहाय निरीक्षकांच्या नियुक्‍त्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
Loading...

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथील अत्यंत विश्वासू सहकारी युवक नेते किशोर मासाळ यांची कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षाला दगाबाजी होऊ नये. स्थानिक गटबाजी उफाळू नये. स्थानिक नेते व कार्यकर्ते यांच्यात योग्य समन्वय रहावा, यासह अन्य बाबींवर लक्ष ठेवण्यासह पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादीने कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित करत, या मतदारसंघावर थेट बारामतीचा वॉच रहावा याकरिता राष्ट्रवादी युवकचे नेते किशोर मासाळ यांच्याकडे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे.

पक्षात ऐनवेळी होणारी दगाबाजी व गटबाजी लक्षात घेता कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघावर किशोर मासाळ यांच्या रूपाने आता बारामतीचे लक्ष राहणार आहे. बारामतीने अर्थात राष्ट्रवादीने मासाळ यांची नियुक्ती करून मतदारसंघावर पुर्ण ताकदीने लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.