रात्री १० नंतर फटाके फोडणाऱ्या आठ जणांना अटक !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सर्वोच्च न्यायालयाने घातलेली वेळेची मर्यादा झुगारून रात्री १० नंतर फटाके फोडणाऱ्या अनेकांवर मुंबईत ठिकठिकाणी आत्तापर्यंत ३७ गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटकही केली आहे. काही ठिकाणी थेट गुन्हा दाखल न करता पोलिसांनी समज आणि दंड आकारून सोडून दिल्याचेही सांगण्यात आले. 

सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करतानाच, रात्री ८ ते १०दरम्यानच फटाके फोडण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही मुंबईत दिवाळीच्या पहिल्या दिवसापासूनच वेळेचे बंधन जुगारून फटाक्यांची आतषबाजी सुरू आहे. मध्यरात्री उशिरा फटाके फोडणाऱ्या दोघांवर बुधवारी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

गुरुवारी रात्री रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांकडे उशिरा फटाके वाजत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर गस्त वाढवून चार रस्ता, वडाळा तसेच आजूबाजूच्या परिसरातून अवेळी फटाके फोडणाऱ्या आठ जणांना अटक करण्यात आली. याप्रकरणी पाच गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक भागवत बनसोड यांनी दिली. 

याशिवाय मध्य मुंबईतील अॅण्टॉप हिल, माटुंगा आणि सायन या पोलिस ठाण्यांमध्येही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मरिन ड्राइव्ह पोलिसांनीदेखील मुंबई पोलिस कायद्यांर्गत सात जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई केल्याचे समजते.
----------------------------
Loading...
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.