बदनामी केल्यास संस्थान अध्यक्षांना धडा शिकविणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात सुविधांचा अभाव असताना अन्यत्र निधीचे वाटप करणे योग्य आहे का? असा सवाल करत साईबाबा संस्थानकडून जादा भावाने जमीन खरेदी जर होत असेल व यापूर्वी जर कुणी ती केली असेल, तर संबंधितांवर साई संस्थानची फसवणुक केली म्हणून अध्यक्षांनी फौजदारी गुन्हे दाखल करावेत. 


Loading...
बिनबुडाचे आरोप करुन शिर्डी ग्रामस्थांना बदनाम केल्याबद्दल जाहीर माफी मागावी अन्यथा शिर्डीसह पंचक्रोशीतील नागरीक संस्थान अध्यक्षांना धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही,अशा इशारा शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिकांनी दिला आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात नागरिकांनी म्हटले आहे की,साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे मनमानी पध्दतीने साईसंस्थानचा कारभार करत असून कोट्यावधी रुपयाच्या निधीचे वाटप करुन बाबांची झोळी रिकामी करण्याचा सपाटा लावला आहे. 


शिर्डीत भक्तांना चालण्यासाठी निट रस्ते नाही, अनेक रस्त्यांची कामे निधी अभावी रखडली आहेत. साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात बर्निंग वार्ड, गायनिक वार्ड, बालरोगतज्ञ विभाग आदी सुविधा सुरुवातीपासून नाही. डॉक्टरांची नेमणूक केली जात नाही. अनेक डॉक्टर रुग्णालय सोडून गेले. 


विदर्भास, मुख्यमंत्री सहायत्ता निधी देण्यास केलेल्या ठरावास शासनाची मान्यता मिळते मात्र शिर्डीच्या विकास कामा संदर्भात केलेल्या ठरावास मान्यता का मिळत नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. 


साईबाबा संस्थानकडून जादा भावाने जमीन खरेदी जर होत असेल व यापुर्वी जर कुणी केली असेल, तर संबंधीतांवर संस्थानची फसवणुक केली म्हणून अध्यक्षांनी फौजदारी गुन्हे दाखल करावेत किंवा बिनबुडाचे आरोप करुन शिर्डी ग्रामस्थांना बदनाम केल्याबद्दल जाहीर माफी मागावी अन्यथा शिर्डीसह पंचक्रोशीतील नागरीक संस्थान अध्यक्षांना धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा प्रसिध्दी पत्रकात दिला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.