पाथर्डी तालुक्यात विमानतळ उभारण्याची मागणी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र भगवानगड हे राज्यातील महत्त्वाचे एक तिर्थक्षेत्र आहे. त्यामुळे तालुक्यात राज्यासह देशभरातील भाविकांची कायम वर्दळ असते. जर भगवान बाबांच्या नावाने विमानतळ स्थापन केले तर,या भागात येणाऱ्या सर्वच भाविकांची उत्तम सोय होइल.  
Loading...

त्याचसोबत भगवान बाबांच्या देशभरातील भाविकांना त्यांच्या दर्शनाचा देखील लाभ घेता येईल. त्यामुळे येथे भगवानबाबांच्या नावाने विमानतळाची उभारणी करावी अशी मागणी पाथर्डी तालुक्यातील कुत्तरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम सानप यांनी नागरी हवाई उड्डयनमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. 


या निवेदनात सानप यांनी नमूद केले आहे की, भगवानगड हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तिर्थक्षेत्र आहे. त्यामुळे या ठिकाणी राज्यासह देशभरातील भाविकांची कायम वर्दळ असते. तसेच हे जिल्ह्यातील अनेक तिर्थस्थळांना जोडणारे हे तिर्थक्षेत्र आहे. जर या परिसरात विमानतळाची उभारणी केली तर अहमदनगर, बीड, जालना,उस्मानाबाद आदी जिल्ह्यातील नागरिकांना याचा लाभ होईल. 


भगवान गड परिसरात प्रत्यक्ष विमानतळाच्या जागेची पाहणी करावी व या भागात विमानतळ उभारणीस परवानगी द्यावी अशी मागणी सानप यांनी नागरी हवाई उड्डयणमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.