निवृत्त अधिकाऱ्याचे तीन लाख लांबविले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- निवृत्त विस्तार अधिकारी बॅँकेतून पैसे काढून रस्त्याने जात असताना ओळख असल्याचे भासवून चहा पिण्याचा आग्रह करत मोटारसायकलवर नेऊन अधिकाऱ्याजवळील तीन लाख रुपयांची रोख रक्कम असलेली पिशवी चोरून नेल्याची घटना अकोले शहरात अगस्ती पतसंस्था ते शिवाजी चौकदरम्यान घडली. याबाबत पोलीस ठाण्यात गुलाम महंमद रुस्तुमखान पठाण (निवृत्त विस्तार अधिकारी, रा. इस्लामपेठ, अकोले) यांनी फिर्याद दिली आहे.
Loading...

 त्यात म्हटले आहे, की पठाण यांनी सकाळी पतसंस्थेतून तीन लाख रुपये काढले होते. महात्मा फुले चौकातुन जात असताना एक अज्ञात इसमाने मोटारसायकलवर येऊन ओळख असल्याचे भासवले. चहा पिण्याचा आग्रह करुन त्यांना मोटारसायकलवर बसवून नेले. 


यावेळी शिवाजी चौकाच्या पुढे गाडी गेल्यावर फोन आल्याचा बहाणा करुन गाडी थांबवली, यावेळी पठाण गाडीवरुन उतरले मात्त ३ लाख रुपये रक्कमेची पिशवी गाडीच्या हॅँडलला लावून बोलू लागले असताना अर्जंट काम आहे. पाच मिनिटात आलो, असे म्हणून मोटारसायकल चालकाने पैसे असलेली पिशवी चोरून घेऊन गेला, अशा फिर्यादीवरुन अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.