जनावरे चोरी करणारी टोळी कार्यरत, शेतकरी चिंताग्रस्त.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासा तालुक्यात जनावरे चोरी करणारी टोळी कार्यरत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. शनिवारी पहाटे खडका रोडवरील नागझिरी भागातील अनेक शेतकऱ्यांच्या दारासमोरून अज्ञात चोरट्यांनी चार गावरान गाय चोरून नेल्याने वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरणात आहे. 


Loading...
पोलिस यंत्रणा सुस्त बनली असून रात्रीची गस्त वाढविण्याची गरज आहे. सुमारे दीड लाखांची ही जनावरे असल्याचे सांगितले जाते. नेवासा-खडका रस्त्यावरील नागझिरी भागात अनेक शेतकरी वाड्यावस्त्यावर राहतात. या भागात अधूनमधून चोरट्यांचा धुमाकूळ चालू असतो. शेळ्या, गाया, कालवडी, कोंबड्या, बोकडे अशी पाळीव जनावरांची अज्ञात चोरट्यांनी बऱ्याचवेळी चोरी केलेली आहे. 

महिन्यापूर्वी दिवसाढवळ्या दादा नरवडे यांच्या घरातून गॅसटाकीसह शेगडी पळवली होती. शेळ्या देखील चोरीस गेलेल्या आहेत. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करूनही तपास मात्र होत नाही. त्यामुळे नागरिक तक्रार देण्यास हयगय करतात.


शनिवार पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी टेम्पोच्या सहाय्याने नागझिरी भागातील हनुमानवाडी येथील दिपक कडू यांच्या गोट्यातून चार-पाच गायामधून गावरान गायीची चोरी केली त्याच दरम्यान शेजारीच असलेल्या मोहन शिंदे यांच्या दारासमोरील दोन दुभत्या गावरान गायी व एक गोऱ्हा चोरून नेला. 


पहाटे चार वाजता हा प्रकार निदर्शनास आला. या शेतकऱ्यांनी आसपास शोध घेण्याचा प्रयत्न केला. पंरतु, तपास लागला नाही. पोलिसांकडून इतर गंभीर गुन्ह्यांचाच तपास लागत नसल्याने जनावरे चोरीचा तपास कधी लागेल? त्यामुळे शेतकऱ्यांनी तक्रार दिली नसल्याचे सांगितले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.