साईबाबांच्या दर्शनाला पायी जाणाऱ्या व्यावसायिकाचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगावहुन शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला पायी जात असताना विश्वात्मक जंगली महाराज आश्रम जवळ देसाई फोटो लॅबचे संचालक आनंद अविनाश देसाई यांचा अपघात झाला. कोपरगाव, येवला, वैजापूर मालेगाव या भागात छायाचित्र व्यवसायात त्यांचे मोठे योगदान होते. फ्रेंड्स फोरेवर ग्रुप व टेनिस स्पोर्ट क्लबचे ते सदस्य होते. 


Loading...
ग्रामीण भागातील तरुणांना फोटोग्राफीचे ज्ञान देऊन त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करण्यास मदत केली होती. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते संतोष देसाई यांचे ते बंधू होते. ज्येष्ठ छायाचित्रकार अविनाश देसाई यांचे ते चिरंजीव होते. अहमदनगर, नाशिक जिल्ह्यामध्ये यांचा मोठा नावलौकिक होता.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.