राधाकृष्ण विखे पाटलांना वेठीस धरणाऱ्यांना उत्तर देणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जायकवाडीच्या पाणीप्रश्नी गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी कार्यकर्त्यांसह विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गाड्यांचा ताफा अडविला. न्यायव्यवस्था अस्तित्वात असताना असे कृत्य करणे गैर आहे. 
Loading...

राज्याच्या विकासात व सहकारात ना. विखे यांचे मोठे योगदान आहे. जिल्ह्याच्या नेतृत्वाला अशा पद्धतीने वेठीस धरण्याचा प्रयत्न कुणी करत असेल, तर त्याला उत्तर दिले जाईल, असा इशारा राहाता तालुक्यातील विविध ग्रामपंचायत व सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.


या प्रकाराचा बाजार समिती संचालक शरद मते, रुई ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप वाबळे, नांदूर्खीचे सरपंच विद्या ओमेश जपे, सावळीविहीर खूर्दचे सरपंच सुजाता महेश जमधडे, निघोज ग्रामपंचायतचे सरपंच गणेश कनगरे, अभिजित मते, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब जपे, सामाजिक कार्यकर्ते, कैलास कातोरे, राजेंद्र गाडेकर, कैलास गाडेकर, विजय कातोरे, माजी उपसभापती दीपक तुरकणे, प्रसाद मते, संजय गव्हाणे, नितीन गोंदकर यांनी निषेध केला आहे. 


त्यांनी म्हटले आहे, की आ. बंब हे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना सर्व परिस्थितीची माहिती असताना केवळ लोकप्रियतेसाठी व पुढील निवडणुकीवर डोळा ठेवून तेथील जनतेला ते किती कार्यक्षम आहेत, हे दाखविण्यासाठी केलेला हा प्रकार अतिशय नियोजनबद्ध आहे.


 गंगापूर तालुक्यात जे उसाचे क्षेत्र आहे, त्यासाठी गोदावरीच्या पात्रातून अनधिकृत उपसा गेल्या अनेक वर्षांपासून केला जाता आहे. त्याबाबत मात्र त्यांनी मौन धरले आहे. यातच त्यांचा राजकीय स्वार्थ सामावलेला आहे. रुई येथे ग्रामस्थांच्या वतीने आमदार प्रशांत बंब यांच्या निषेधाचे निवेदन तलाठी गायके यांना देण्यात आले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.