ह्या लोकांवर तडीपारीचे संकट,निवडणूक होईपर्यंत राहावे लागणार शहराबाहेर !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिका निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी आधीपासूनच सावध असलेल्या पोलिसांनी महापालिकेच्या निवडणुकीत अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेत पोलिसांनी पुन्हा तडीपारीचे प्रस्ताव सादर केले होते.आज यावर सुनावणी पूर्ण झाली असून १७ जणांवर तडीपारीचा प्रस्ताव मंजूर असून त्यांना १० डिसेंबरपर्यंत जिल्ह्याबाहेर राहावे लागणार आहे.
Loading...
नगर शहरातून हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे -

हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये अशोक लव्हाळे (तोफखाना), मतिन शेख (जुनाबाजार), ठकाजी गेणप्पा (गवळीवाडा), तनवीर गुलाब (पटवर्धन चौक), अनिल काशिनाथ शिंदे (भोरी चाळ), राजेंद्र कोतकर (केडगाव), विष्णू दळवी (कुंभार गल्ली), वैभव सावेकर (गांधी मैदान), संदिप श्रीयाळ (शिवम प्लाझा जवळ), नितीन काते (रेल्वे स्टेशन), बाळु पाचारणे (केडगाव), मोहसिन पठाण (केडगाव), विजय सुंबे (केडगाव), फैरोज खान (आशा टॉकीज चौक), पारंदामुल बाबा गौड (तोफखाना), विशाल रावसाहेब साठे (माळीवाडा), प्रवीण पंडीतराव साठे (केडगाव) आदींचा समावेश आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.