कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या बदनामीचे षडयंत्र, खांद्यावर बंदुका ठेवून नका समोर लढा .....


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :स्वर्गिय कुंडलिकराव तात्या जगताप यांनी संघर्षातून उभ्या केलेल्या कुकडी सहकारी साखर कारखान्याला बदनाम करण्याचे षडयंत्र कुणाच्या तरी इशाऱ्यावरुन सुरु आहेकारखान्याच्या साखर ठेवलेल्या गोडावूनला सील केल्याच्या कपोकल्पीत बातम्या पसरविल्या जात आहेतज्यांच्या इशाऱ्यावरुन हे सुरु आहे त्यांनी जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज ठेवायला पाहिजे. 

Loading...

जो कारखाना सक्षमपणे सुरु आहे शेतकऱ्यांना रास्त भाव मिळतो त्याच कारखान्याची बदनामी करुन शेतकऱ्यांच्या अन्नात मीठ कालविण्याचा हा धंदा बंद करावाकारखान्याचे साखर गोडावून सील केलेले नाही कुठलाही पुरावा नाहीमाहिती नाही आणि सोशल मिडीयावरुन बदनामी करण्याचे कारस्थान सुरु आहेज्यांनी हे प्रसिध्द केले आहे त्यांच्याविरोधात कायदेशिर कारवाई कारखाना करणार आहे.अर्धवट माहिती घेवून कुकडी व कार्यसम्राट आमदार राहूलदादा कुंडलिकराव जगताप पाटील यांच्या विरोधातील ही बदनामीची मोहिम हाती घेणाऱ्यांच्या घरात आणि पुण्यात काय सुरु आहे याचा पर्दाफाश करुकुकडीरुपी सुर्य झाकण्यासाठी असे कितीही हात आले तरी कुकडी हा शेतकऱ्यांचा कारखाना असून कुणाची खाजगी मालमत्ता नाही. अशी माहिती कारखान्याचे माव्हा.चेअरमन विश्वासराव थोरात यांनी दिली.

कुकडी सहसाखर कारखाना हा नेहमी शेतकरीसभासद व ऊस उत्पादक यांचे हित लक्षात घेवून निर्णय घेतोकारखाना चांगल्या पद्धतीने चालतो.कारखान्याचे संस्थापक कर्मयोगीस्वकुंडलिकराव (तात्याजगताप पायांनी अथक परिश्रमातुन शेतकऱ्यांसाठी उभी केलेली ही सहकारी संस्था आहेस्व.तात्यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना सुस्थितित चालू होतामात्र काही लोकांना या संस्थेचे हित पाहवत नाहीत्यामुळे राजकीय आकासापोटी सर्वसामान्य ऊस उत्पादक व सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करुन कारखान्याची बदनामी करण्याचा हेतू आहेसर्व सहकारी साखर कारखान्यांना जिल्हा बॅंक व इतर बॅंका साखर मालतारणावर कर्जपुरवठा करत असतातकुकडी सहसाखर कारखान्यास उभारणीपासुन अनगर जिल्हा मध्यसहबॅंकेने कर्जपुरवठा केला आहे

कारखान्याचे कुठल्याही प्रकारे गोडावून सील केलेले  नाही. त्यामुळे जाणीवपुर्वक पसरवलेल्या या अफवांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये असे जाहिर आवाहन कारखान्याचे मा.व्हा.चेअरमन विश्वासराव थोरात यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे माव्हा.चेअरमन सुखदेवराव तिखोलेजेष्ठ मार्गदर्शक व मा.संचालक नारायण पाटील जगतापसंचालक विवेक पाटील पवार आदि उपस्थित होते.


----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.