भाजप सरकार असंवेदनशील - अजित पवार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भाजप सरकारने जनतेला फक्त गाजर दाखवले, ते अद्याप 'अच्छे दिन' देऊ शकले नाहीत. अशा थापाड्या सरकारला गाडून टाका, असे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कर्जत येथे बोलताना सांगितले. 


Loading...
ज्येष्ठ नेते बापूसाहेब गुंड यांचा जीवन गौरव सोहळा बुधवारी कर्जत येथे झाला. युवा नेते राजेंद्र गुंड यांनी या वेळी मोठे शक्तिप्रदर्शन करत शेतकरी मेळावा घेतला. कर्जत व जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादीचे सर्व नेते या वेळी उपस्थित होते. 

अध्यक्षस्थानी दयानंद महाराज कोरेगावकर होते. या वेळी पवार म्हणाले, भाजप-सेनेचे सरकार थापेबाज आहे. त्यांनी केलेली कर्जमाफी फसवी आहे. राज्यातील शेतकरी व जनता भयानक दुष्काळी परिस्थितीमुळे हवालदिल झाली आहे. शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. 


पिण्याच्या पाण्याची स्थिती बिकट झाली आहे, मजुरांना रोजगार उपलब्ध नाही, तरीही सरकार असंवेदनशील आहे. बापूसाहेब गुंड यांनी शतक साजरे करावे. त्यांचा आदर्श आजच्या युवा पिढीने घ्यावा, असे आवाहन पवार यांनी केले. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Powered by Blogger.