पंतप्रधान मोदी लाईव्ह @ शिर्डी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसीय शिर्डी दौऱ्यावर आले आहेत. साईबाबांच्या समाधीच्या शताब्दी उत्सवाचा आज समारोप पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणार आहे. त्या निमित्ताने पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी पहिल्यांदाच शिर्डीत आले होते. त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं.

साईबाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त शिर्डी इथं आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज घरकुल योजनेतील ११ हजार लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचं वाटप करण्यात आलं. पंतप्रधानांनी स्वत: दहा लाभार्थ्यांना चाव्या देऊन या उपक्रमाचा शुभारंभ केला. नंदूरबार, नागपूर येथील लाभार्थ्यांशी यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मराठीत संवाद साधला. त्यामुळं त्यांचा आनंद द्विगुणित झाला. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
                                                     --------------------------------
Powered by Blogger.