अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीला जामखेडमधून अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. अश्पाक याकूब सय्यद (२३, खामगाव, ता. शेवगाव) असे आरोपीचे नाव आहे. 

Loading...

मुलीचे वडील व अश्पाक यांच्यात सहा महिन्यांपूर्वी वाद झाले होते. त्यावेळी अश्पाकने मुलीला पळवून नेण्याची धमकी दिली होती.मुलगी शाळेत जात असताना आरोपीने तिचे अपहरण केले. ही घटना २४ ऑक्टोबरला घडली.
गुन्ह्याचा तपास करताना आरोपी पीडित मुलीसह जामखेड येथे रहात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.