मोनिकाताई राजळे लवकरच नामदार होतील !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी- शेवगाव मतदारसंघातील जनतेला मोनिकाताईंच्या माध्यमातून एक शांत, संयमी, आईच्या रुपात शांतीब्रम्हच लाभले असून, अशा कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधीला नारायण बाबांच्या आशीर्वादाने नामदार होण्याची संधी निश्चित मिळेल, असे मनोगत तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी व्यक्त केले. 


Loading...
येथे वृध्देश्वर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ महंत आदिनाथ महाराज शास्त्री व महंत ज्ञानेश्वर महाराज कराळे यांच्या हस्ते सोमवारी पूजन करून करण्यात आला, या वेळी ते बोलत होते.

शास्त्री महाराज पुढे म्हणाले, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे मोनिकाताईंचे कार्य समाजाला दिसत आहे. सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. लोकनेते गोपीनाथ मुंडे लोकनेत्या ना. पंकजाताई मुंडे, राजीव राजळे यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे, त्यामुळे मनाला वाटतं त्या नामदार होतील, असे शास्त्री महाराज म्हणाले.

आ. राजळे म्हणाल्या, वृध्देश्वर साखर कारखाना अनेक संकटांवर मात करून सुरू ठेवला असून, इतर कारखान्यांपेक्षा कमी भाव दिला जाणार नाही. कामगार, व्यवस्थापन, सभासद, आणि शेतकऱ्यांच्या सहकार्याने कारखान्याची योग्य वाटचाल सुरू आहे. यावर्षी कारखाना साडेपाच लाख टन उसाचे गाळप करणार असून, शेवगाव- पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस प्राधान्याने उचलला जाईल.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.